महत्वाच्या बातम्या

 नागपूर पदयात्रेसाठी चंद्रपूरमधून ३५ बसमध्ये कार्यकर्ते नागपूरकडे रवाना


- लोकशाही वाचवा, अराजकता हटवा पदयात्रेत सहभागी होण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; चलो नागपूरचा नारा देत कार्यकर्त्यांचे प्रस्थान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही वाचवा, अराजकता हटवा या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूरमधून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा ताफा नागपूरच्या दिशेने रवाना झाला. चंद्रपूर महानगरातून तब्बल ३५ बस कार्यकर्त्यांनी भरून नागपूरकडे प्रस्थान केल्या. लोकशाही वाचवा, अराजकता हटवा आणि चलो नागपूर अशा घोषणांनी यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

नागपूर येथे आयोजित या पदयात्रेत चंद्रपूर भाजपाचा व्यापक सहभाग असावा, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी  नियोजन केले होते. त्यानुसार महानगरातील पक्षाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यकर्त्यांच्या प्रवासासाठी ३५ बसची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व बस कार्यकर्त्यांनी भरून नागपूरकडे रवाना झाल्याने या पदयात्रेसाठी चंद्रपूर भाजपाने केलेल्या तयारीला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले.

लोकशाही मूल्यांचे रक्षण, जनहिताचे प्रश्न आणि पक्षाच्या भूमिकेला बळ देण्याच्या उद्देशाने आयोजित या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.





  Print






Related Photos