जिल्ह्यात २,५०० हेक्टरवर मोहरी लागवडीचे उद्दिष्ट : पीक विविधीकरणासाठी कृषी विभाग व आत्माचा पुढाकार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : खरीप हंगामातील भात काढणीनंतर पडीक राहणाऱ्या जमिनीचारब्बी हंगामात उपयोग करून मोहरीसारख्या पर्यायी पिकांच्या लागवडीला चालना देणे आणि पीकविविधीकरणातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, या अनुषंगाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनीजिल्हास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन केले. जिल्ह्यात यंदा २,५०० हेक्टर भातपड क्षेत्रावर रब्बी मोहरीलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२०२७ मधील नाविन्यपूर्ण बाबींअंतर्गत पीक विविधीकरणकार्यक्रमातून भातपड क्षेत्रावर रब्बी मोहरी लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावीअंमलबजावणीसाठी ३ नोव्हेंबर रोजी समाजकल्याण भवन, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडायांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत मोहरी लागवडीचा विस्तार, सुधारितउत्पादन तंत्रज्ञान, निविष्ठांचे नियोजन, पीक व्यवस्थापन, शेतमालाचे विपणन आणि मूल्यवर्धन या विषयांवरमार्गदर्शन करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भाताची लागवड केली जाते. भात काढणीनंतरमोठ्या प्रमाणावर जमीन पडीक राहते. या क्षेत्रावर रब्बी हंगामात मोहरीसारख्या कमी कालावधीच्या पर्यायीपिकांची लागवड केल्यास जमिनीचा अधिक कार्यक्षम वापर होण्याबरोबरच शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी उपलब्ध होऊ शकते. या उद्देशाने जिल्ह्यात मोहरी लागवडीचा विस्तार करण्यासाठी कृषी विभाग वआत्माने पुढाकार घेतला आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहारअर्पण करून करण्यात आले. यावेळी मोहरी लागवडीविषयी माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यातआले. आत्माच्या प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी प्रास्ताविकातूनकार्यशाळेचा उद्देश आणि पीक विविधीकरण कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली.कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. किशोर झाडे यांनी मोहरी पीकलागवड व व्यवस्थापन, कीड आणि रोग नियंत्रण तसेच मधुमक्षिकापालन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी आनंद कांबळे यांनी मोहरी पिकाच्यामूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यशाळेत शेतकऱ्यांमध्ये मोहरी लागवडीबाबत जनजागृती करणे, प्रत्यक्ष क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिकेराबविणे, लागवड क्षेत्र वाढविणे आणि उत्पादित शेतमालाच्या विक्रीसाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणेयाबाबत नियोजन करण्यात आले. निश्चित केलेले लागवडीचेउद्दिष्टसाध्य करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी,कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या सहभागातून कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेला जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी,उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक वसमूह सहाय्यक उपस्थित होते. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक, कृषी सखी, कृषी ताई, प्रगतिशीलशेतकरी आणि महिला शेतकरी सहभागी झाले.भात काढणीनंतर जमीन पडीक न ठेवता रब्बी हंगामात मोहरीसारख्या पर्यायी पिकांची लागवडकरावी. पीक विविधीकरणाचा स्वीकार करून शेतीतून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकारघ्यावा, असे आवाहन कृषी विभाग व आत्मा, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वडसा येथील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद रहांगडाले यांनी केले, तरमुलचेरा येथील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आकाश लवटे यांनी आभार मानले. आयोजनासाठी जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, आत्मा, स्मार्ट प्रकल्प व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातीलअधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.




Petrol Price




