महत्वाच्या बातम्या

 आदर्श वनकरची आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूरद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथील कबड्डीपटू आदर्श वनकर याची आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठ, सागर (मध्य प्रदेश) येथे १३ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत आदर्श वनकर गोंडवाना विद्यापीठाच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

आदर्शच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





  Print






Related Photos