महत्वाच्या बातम्या

 नियंत्रण कक्षामार्फत ५२४ तक्रारींचा निपटारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील मतदार व सर्वसामान्य नागरिकांसाठी माहितीची देवाणघेवाण सुलभ होण्यासाठी तसेच निवडणुकीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षामार्फत 24 एप्रिल 2024 पर्यंत 524 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षात दुरध्वनीव्दारे विविध समस्येच्या एकूण 368 तक्रारी प्राप्त असून राष्ट्रीय तक्रार निवारण प्रणालीवर (एन.जी.आर.एस.) 134 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच सीव्हिजील ॲपवर 15 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नियंत्रण कक्षाने या सर्व तक्रारींचे निराकरण केले, अशी माहिती तक्रार निवारण कक्षाचे नोडल अधिकारी अनिरुध्द राजुरवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक (07152)-254060,254061,254062,254063, 254064, 254065, 254066, 254067, 254068, 254069 हे दहाही दुरध्वनी क्रमांक व 1950 हा हेल्प लाईन क्रमांक निवडणुकीच्या काळात 24 तास कार्यरत असणार आहे.





  Print






News - Wardha




Related Photos