महत्वाच्या बातम्या

 लॉयड्स काली अम्मल हॉस्पिटल हेडरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन


- संचालक बी. प्रभाकरन यांचा सोबत ५० अधिकारी आणि कर्मचारी रक्तदान केले 

- रक्तदान ही लॉयड्सची आवड आहे : संचालक बी. प्रभाकरन

- अतिदुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी भागात उच्च दर्जाचा मोफत आरोग्य सुविधा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल हेडरी येथे लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड द्वारे प्रत्येक महिन्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांची काल २० एप्रिल २०२४ रोजी रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले असुन सर्व प्रथम लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी शिबिरात रक्तदान केले. लॉयड्स कंपनीचे ५० अधिकारी आणि कर्मचारी यांनी रक्तदान केले. सर्व समुहातील सदस्यांनी दर महिन्याला किमान ५० युनिट रक्त देण्याचे आश्वासन दिले आणि ते आजारी व्यक्तीला बरे होईल. लॉयड्स टीम नी मोलाची कामगिरी करत आहे.

अति दुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी भागात उच्च दर्जेचा मोफत आरोग्य सुविधा - 

एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी नक्षल प्रभावीत सुरजागड परिसरात मुलभूत आरोग्य सुविधा मिळणे ही कठीण होते. पण परिसरातील आदिवासीना उच्च दर्जाचा आरोग्य मिळण्याकरिता लॉयड्स मेटल्स कंपनीचे पुढाकाराने हेडरी येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे काली अम्मल हॉस्पिटल सुरू केलेत. अन या परिसरातील आदिवासी गरीब व गरजूंना मोठा आधार झाले. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी २४/७ तास रुग्ण सेवा देत आहेत.

लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल ८ नोव्हेंबर २०२३ ला सामन्याचा सेवेत कार्यविनीत झाले. या ठिकाणी दहा तज्ज्ञ डॉक्टर ४० हुन अधिक आरोग्य कर्मचारी परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देत आहेत. या हॉस्पिटल ल सुरजागड, हेडरी, गट्टा, जांभिया एटापल्ली, भामरागड तालुका  आलापल्ली, अहेरी सह गडचिरोली जिह्यातील दररोज शेकडो रुग्ण मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतात.





  Print






News - Gadchiroli




Related Photos