महत्वाच्या बातम्या

 इयत्ता ४ थी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना उन्हाळी मार्गदर्शन वर्ग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : कोविड मुळे बरेच विद्यार्थी अभ्यासात मागे पडले..! बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही. अशा विद्यार्थ्यांना उन्हाळी मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, अंकगणित व बुद्धिमत्ता विषय बेसिक मार्गदर्शन वर्ग कल्पतरू अकॅडेमी मध्ये प्रथम बॅच २० एप्रिल व द्वितीय बॅच ०५ में २०२४ पासून सकाळ व सायंकाळी सुरु होते आहे. 

सदर मार्गदर्शन वर्गाला स्पर्धा परीक्षेचे (शिक्षक )मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. विविध शॉर्ट कट, युक्त्या वा क्लुप्त्या, तर्क- अनुमान शक्ती वाढवणाऱ्या बाबी विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे. स्कॉलरशिप व जवाहर नवोदय / सैनिक विद्यालय पूर्व परीक्षा देणाऱ्या तसेच शालेय अभ्यासक्रम मध्ये या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे व सुट्ट्याचा सदुपयोग होईल तरी गडचिरोली शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदर उन्हाळी मार्गदर्शनाचा फायदा घ्यावा, असे आव्हाहन कल्पतरू अकॅडेमी च्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहिती करीता विद्यार्थी वा पालकांनी कल्पतरू अकॅडेमी, युनियन बँक जवळ, सावकार कॉम्प्लेक्स, धानोरा रोड, गडचिरोली मो. ७५८८७७३१०५ येथे संपर्क साधावा.





  Print






News - Gadchiroli




Related Photos