आजचे दिनविशेष
८ मार्च महत्वाच्या घटना
१८१७ : न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना.
१९११ : पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.
१९४२ : दुसरे महायुद्ध: जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.
१९४८ : भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली सेवा सुरु केली.
१९४८ : फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.
१९५७ : घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९७४ : चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस, फ्रान्स मध्ये सुरु झाले.
१९७९ : फिलिप्स कंपनी ने प्रथमच सार्वजनिकरित्या कॉम्पॅक्ट डिस्क चे प्रकाशन केले.
१९९३ : दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरीट ऑफ जे. आर. डी. असे नाव देण्याचे ठरविले.
२०१६ : पूर्ण घडलेले सूर्यग्रहण इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिक मधून दिसले.
८ मार्च जन्म
१८६४ : कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९१९)
१८७९ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन शात्रज्ञ ऑटो हान यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९६८)
१८८६ : जीवरसायन शास्रज्ञ एडवर्ड कालव्हिन केन्डॉल यांचा जन्म.
१९२१ : गीतकार साहीर लुधियानवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९८०)
१९२८ : कथालेखक वसंत अनंत कुंभोजकर यांचा जन्म.
१९३० : कवी, कादंबरीकार आणि नाटककार चिंतामण त्र्यंबक खालोलकर उर्फ आरतीप्रभू यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९७६)
१९३१ : प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै २०१०)
१९६३ : भारतीय क्रिकेटपटू गुरुशरणसिंग यांचा जन्म.
१९७४ : अभिनेता फरदीन खान यांचा जन्म.
८ मार्च मृत्यू
१७०२ : इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १६५०)
१९४२ : क्यूबाचा बुद्धीबळपटू जोस रॉल कॅपाब्लांका यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८८८)
१९५७ : स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८८८)
१९८८ : भारतीय गायक-गीतकार अमर सिंग चमकिला यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९६०)
News - todayspecialdays