महत्वाच्या बातम्या

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आंतरराज्य सीमेवरील जिल्हामध्ये समन्वय बैठक संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातील भंडारा, गोंदिंया तसेच या जिल्हयांच्या सीमेलगत मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट या जिल्हातील महसूल व पोलीस अधिकाऱ्यांची आंतरराज्य सीमा बैठक आज २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी पार पडली. छेरींग दोरजे, विशेष पोलीस महानिरिक्षक, परिमंडळ नागपूर यांनी सदर बैठकीचे अध्यक्ष स्थान भुषविले.

यावेळी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी आपले कार्यक्षेत्रातील आंतर राज्य सिमेवरील तपासणी नाके व लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने रोख रक्कम, मद्य अंमली पदार्थ, वस्तू इत्यादीचे बेकायदेशिर वाहतूक यावर नियंत्रण व पर्यवेक्षण च्या अनुषंगाने नियोजन सादर केले दोरजे यांनी सर्व उपस्थितांना आंतर राज्य सिमेवरील निवडणूक काळातील विविध वस्तू, मद्य, अंमली पदार्थ, रोख रक्कम इत्यादी यांची वाहतूक यावरील नियंत्रण व निवडणूक कालावधीत गुन्हेगारी आटोक्यात आणणेकामी समन्वयाने कामकाज करणेबाबत महाराष्ट्र व मध्यप्रदेश मधील उपस्थित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.

सदर बैठकीस पोलीस उपमहानिरिक्षक गडचिरोली, अंकित गोयल, पोलीस उपमहानिरिक्षक, बालाघाट  मुकेशकुमार श्रीवास्तव, जिल्हाधिकारी भंडारा योगेश कुंभेजकर, जिल्हाधिकारी बालाघाट डॉ. गिरिश कुमार मिश्रा, पोलिस अधिक्षक, बालाघाट समिर सौरभ, जिल्हा पोलिस अधिक्षक, भंडारा लोहीत मतानी, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क बालाघाट गोंदिया, भंडारा उपविभागीय अधिकारी व पोलीस उपविभागीय अधिकारी कंटगी, शिवनी, तिरोडा, तुमसर, व गोंदिया या ठिकाणचे अधिकारी उपस्थित होते. 

सदर वेळी योगेश कुंभेजकर जिल्हाधिकारी भंडारा, यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. तसेच लोहीत मतानी जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.





  Print






News - Bhandara




Related Photos