महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हयातील मोटारसायकल चोराकडून एक मोटारसायकल हस्तगत


- स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले आहे. वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना त्याबाबत निर्देश दिले होते. पोलिस निरीक्षक महेश कोडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पथक हे मोटार सायकल चोरीचे रेकॉर्डवरिल गुन्हेगार शोध मोहीम पेट्रोलिंग राबवीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोस्टे कुरखेडा जि. गडचिरोली येथे जावुन सापळा रचून मोटार सायकल चोर आरोपी नामे  गोकुल शुभाष यावलकर 23 वर्षे रा.राणा प्रताप वार्ड, कुरखेडा जि.गडचिरोली याला ताब्यात घेवुन त्याचे मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

घूग्गुस पोलीस स्टेशन येथे अपराध क्र. ३४/२४ कलम ३७९ भांदवी नोंद असलेली मोटार सायकल पन्नास हजार रुपये जप्त केली गेली. सदर जप्त करण्यात आलेली  मोटार सायकल व आरोपी पोस्टे घुघ्युस यांचे ताब्यात देण्यात आले असून पो.स्टे. घुग्गुस् येथील दाखल असलेली चोरीचा गुन्हा उघडकीस करण्यात आला.

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात महेश कोडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, यांचे नेतृत्वात, विनाद भुरले, संजय आतकुलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार यांनी केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos