महत्वाच्या बातम्या

 १८ जानेवारी ला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी नागपूर जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र  व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ  यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवार, 18 जानेवारीला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, कॉन्होकेशन हॉल, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, महाराज बागेजवळ, सिव्हिल लाईन, नागपूर येथे करण्यात आलेले आहे. बेरोजगार उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

रोजगार मेळाव्यामध्ये Anugrah hanuman Resources, Avesten Technology, Recruitlogy,Jaika Motors, Hexaware Pvt. Ltd आदी कंपन्यामार्फत Homeloan Executve, Civil Site Engineer, Soft skill /trainer, Business Develoment Manager, ITI Welder/Electrician, Tender Executive आदी 300 पेक्षाजास्त जागांसाठी दहावी, बारावी, पदवी, पदवीत्तर, आटीआय, डिप्लोमा पात्रताधारक 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाणार आहे. याव्दारे जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.





  Print






News - Nagpur




Related Photos