लोकसभेत ३५१ विरुद्ध ७२ मताने कलम ३७० रद्द करण्याचं ऐतिहासिक विधेयक मंजूर


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली : राज्यसभेपाठोपाठ आज लोकसभेतही कलम ३७० रद्द करण्याचं ऐतिहासिक विधेयक ३५१ विरुद्ध ७२ मताने मंजूर करण्यात आलं. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचं विधेयकही ३६६ विरुद्ध ६६ मतांनी मंजूर करण्यात आलं. आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. ही दोन्ही विधेयकं मंजूर झाल्याने जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन्ही राज्ये अस्तित्वात येण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे काश्मीर ३७० कलम मुक्त करण्याचं भाजपचं स्वप्न साकार झालं आहे.   Print


News - World | Posted : 2019-08-06


Related Photos