महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अनुभवले विधिमंडळाचे कामकाज


- पदव्युत्तर विधी विभागाचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागातील विद्यार्थ्यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज अनुभवले. विद्यार्थ्यांना संसदीय कार्यपद्धतीची माहिती व्हावी म्हणून पदव्युत्तर विधी विभागाच्या वतीने  बुधवार, २० डिसेंबर २०२३ रोजी या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यातील कायदेमंडळ असलेल्या विधिमंडळाचे कामकाज त्याचप्रकारे महत्त्वाच्या समकालीन कायदेशीर समस्यांवर कशाप्रकारे चर्चा केली जाते. याची माहिती मिळविणे हा या शैक्षणिक भेटीचा उद्देश होता. या भेटीचे आयोजन पदव्युत्तर विधी विभागाच्या प्रमुख डॉ. पायल ठावरे यांनी केले होते. प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना विभागातील विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळाला. विधिमंडळाचे प्रतिनिधित्व करणारे (आमदार) विधिमंडळ सदस्यांकडून राज्यातील वैद्यकीय पायाभूत सुविधांशी संबंधित गंभीर मुद्द्यावर चर्चा केली जात होती. आमदारांकडून सुरू असलेल्या गंभीर मुद्द्यावरील चर्चे दरम्यान विद्यार्थ्यांना विधिमंडळाचे कामकाज बघता आले. 

विद्यार्थ्यांसाठी हा एक समृद्ध करणारा असा शैक्षणिक अनुभव होता. यातून विद्यार्थ्यांना विधिमंडळाच्या कार्यवाहीचे प्रथमदर्शनी दर्शन घडले. विद्यार्थ्यांनी यावेळी संसदीय कार्यपद्धतीची गुंतागुंत आणि राजकीय स्थिती अनुभवली. सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यातील गरमागरम वादविवादांनी एक आकर्षक अनुभव दिला. विभागातील एलएलएमचे ७० पेक्षा अधिक विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. विभागातील शिक्षक कु. ऋचा कोचर, कु. शिवानी खंडाते आणि कु. पद्मा घटामे यांनी यशस्वीपणे भेटीचे संयोजन केले. विद्यार्थ्यांसाठी हा एक समृद्ध शैक्षणिक अनुभव होता.





  Print






News - Nagpur




Related Photos