महत्वाच्या बातम्या

 देवरी येथे धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न


- आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था ता. देवरी. जि. गोंदिया

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया (देवरी) : आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था ता. देवरी येथे धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ खासदार अशोक नेते यांच्या हस्ते पार पडला.

या धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभा प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी व्यक्त करतांना शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्याला आधारभूत किंमत मिळावी. यासाठी सरकारने आधारभूत धान्य खरेदी केंद्रे सुरु केले आहे. या अनुषंगाने आज २० नोव्हेंबर २०२३ ला आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था ता. देवरी चा धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. यांचा लाभ देवरी परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी उदघाटन समारंभ सोहळा प्रसंगी केले.

यावेळी प्रामुख्याने माजी आमदार संजय पुराम, आदिवासी वि. महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग,संचालक को-ऑ. बँक गोंदियाचे महेशकुमार जैन, आदिवासी संस्था चे अध्यक्ष धुलीचंद मानकर, सभापती कृ.उ.बा.स. देवरीचे प्रमोद संगीडवार, देवरी चे नगराध्यक्ष संजय उईके, भाजपा जिल्हा महामंत्री अनिल येरणे, नगरसेविका कौशल्या कुमरे, संचालक रुपलाल पंधरे, संचालक प्रभा राऊत, संचालक ईसाराम मानकर, संचालक दिलिप राऊत, भाषकर मानकर, सुशिल शेंद्रै, सामाजिक नेते बंटी भाटीया तसेच मोठ्या संख्येने नागरिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos