जांभुळखेडा बाॅम्बस्फोट प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक, आरोपींची संख्या झाली आठ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
 प्रतिनिधी / गडचिरोली :
१ मे रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे नक्षल्यांनी स्फोट घडवून पोलिस जवानांचे वाहन उडविले होते. या घटनेत १५ जवान शहीद झाले तर खासगी वाहन चालक ठार झाला होता. या घटनेचा तपास करीत असताना पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. काल २९ जून रोजी कैलास प्रेमचंद रामचंदानी (३४) रा. कुरखेडा याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १२  जुलै पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
या घटनेचा तपास करीत असताना पोलिस दलाने दंडकारण्य स्पेशल झोनल  समितीची सदस्या तसेच वेस्टर्न सब झोनल प्रमुख उप्पगुंटी निर्मलाकुमारी उर्फ नर्मदाक्का व तिचा पती सत्यनारायण उर्फ किरणकुमार याला अटक केली होती. त्यांच्या चौकशी दरम्यान काही नावे समोर आली. त्यानुसार पोलिसांनी अटकसत्र सुरू केले. आतापर्यंत दिलीप श्रीराम मडावी, परसराम मंगाराम तुलावी, सोमसाय दलसाय मडावी, किसन सिताराम हिडामी, सकरू रामसाय गोटा सर्व रा. लवारी ता. कुरखेडा यांना अटक करण्यात आली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-30


Related Photos