सामंत गोयल 'रॉ ' चे नवे प्रमुख तर 'आयबी' च्या संचालकपदी अरविंद कुमार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
उरीनंतरचा सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट हवाई हल्ल्याची अचूक व यशस्वी योजना आखून पाकिस्तानला दणका देणारे सामंत गोयल यांची 'रॉ' (रिसर्च अँड ॲनालिसिस विंग) च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, जम्मू काश्मीर विषयातील तज्ञ मानले जाणारे अरविंद कुमार यांच्याकडं आयबीच्या संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या दोघांची निवड केली असून लवकरच हे आपला पदभार स्वीकारणार आहेत. 
सामंत गोयल यांनी बालाकोट हवाई हल्ल्याची आखणी आणि नियोजन केलं होतं. तर अरविंद कुमार हे आसाम-मेघालय केडरचे आयपीएस अधिकारी असून अनेक वर्षांपासून आयबीसाठी ते काम करत आहेत. देशातील नक्षलवादाला वेसण घालण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. 'रॉ' ही शत्रूराष्ट्रांच्या कारवायांवर लक्ष ठेवणारी गुप्तहेर संस्था आहे तर देशांतर्गत हिंसाचार, देशविरोधी कारवायांवर करडी नजर ठेवण्याची जबाबदारी 'आयबी'वर आहे.   Print


News - World | Posted : 2019-06-26


Related Photos