महत्वाच्या बातम्या

 नारीशक्ति वंदन अधिनियम नवीन संसद भवनात महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय सुवर्ण अक्षराने लिहीणारा : खा. रामदास तडस


- प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील आणखी एक पथदर्शी निर्णय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : देशाचा विकास करायचा असेल, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या तत्वानुसार कार्य करायलो पाहीजे तसेच नवे मापदंड निर्माण करायचे असतील तर सर्वाचा विकास व्हायला पाहिजे असे लोकप्रीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांच्या यशस्वी ०९ वर्षाच्या कार्यकाळात अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले आहे, ते लोकसभेतच नव्हे तर राज्यसभेतही बहुमताने पास केलेले आहे. महिला आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहेत. अनेक ठिकाणी नेतृत्त्व करत आहेत, सरकारी योजनांचा लाभ महिला वर्ग जास्त घेतांनी दिसत आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात वेगाने विकास करत आहेत. त्यामुळे देशाची धोरणे ठरवण्यात नारीशक्तीचे योगदान आवश्यक आहे. गणेशचतुर्थीचा दिवसी नव्या संसदेच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी नव्या बदलासाठी, नारीशक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन संसद भवनात महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय देशातील महिलांकरिता सुवर्ण अक्षराने लिहीणारा ठरेल अशी प्रतिक्रिया खासदार रामदास तडस यांनी दिली.

महिलांच्या आरक्षणाबाबत गेली अनेक वर्षे केवळ चर्चाच सुरू होती, परंतु यावर निर्णय होत नव्हता, महिलांना संसदेची प्रवेशद्वारं खुली करण्यासाठी, महिलांच्या विकासाचा संकल्प पुढे नेण्यासाठी नारीशक्ती वंदन विधेयक लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नारीशक्ति वंदन अधिनियम मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेऊन लोकसभेत सादर केले आहे. केंद्र सरकारने महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले. 

तसेच नारीशक्ति वंदन अधिनियम विधेयक लोकसभेत सोबतच राज्यसभेतही बहुमताने पास होईल, महिलांना लोकसभा व विधानसभेचे मोठया संख्येने प्रतिनीधीत्व करता येईल, उदाहरणार्थ आजच्या परिस्थितीला अनुसरून विचार केल्यास महाराष्ट्रातून १६ महिला खासदार, ९५ महिला आमदार प्रतिनिधित्व करू शकतील. त्यामुळे लोकशाही आणखी मजबूत होईल, राजकीय, सामाजिक जीवनात काम करणाऱ्या महिलांसाठी आरक्षणाचा झालेला निर्णय हा ऐतिहासिक आणि मोठी उपलब्धी ठरेल असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त करुन या निर्णयाकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व समस्त केंद्रीय मंत्रीमंडळाच्या प्रती आभार व्यक्त करतो व स्वतः ला नशिबवान समजतो की, हा ऐतिहासीक क्षण घडत असतांना संसदेत प्रतिनीधी म्हणून उपस्थित होतो व सर्व महिलांचे अभिनंदन केले.





  Print






News - Wardha




Related Photos