२३ मे रोजी बाळाचा जन्म , मुस्लिम कुटुंबाने नाव ठेवले नरेंद्र मोदी


वृत्तसंस्था / लखनौ :  २३ मे  लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी याना घवघवीत यश मिळाले.  याच दिवशी मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या बालकाचे नाव कुटुंबीयांनी नरेंद्र मोदी ठेवले आहे. 
मजमोजणीच्या दिवशी संपूर्ण भारतात पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा जयजयकार होत असताना   उत्तर प्रदेशातील गोंडा या शहरात मुस्लीम कुटुंबात एका बाळाने जन्म घेतला.  बाळाचा जन्म आणि मोदींचा विजय  ही स्मृती कायमस्वरूपी जपत या मुस्लीम कुटुंबाने आपल्या बालकाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवले.   मुस्लीम कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रती आपले प्रेम प्रकट करत सर्वधर्मसमभावाचे एक अनोखे उदाहरण समाजापढे ठेवले आहे.   Print


News - World | Posted : 2019-05-25


Related Photos