महत्वाच्या बातम्या

 भाजपचे घर चलो अभियान : उत्तर भारतीय महिला मोर्चा चे जनसंपर्क


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर, ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, शहर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, भाजप नेते रामपाल सिंह, महिला प्रदेश सरचिटणीस अलका आत्राम वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर व चंद्रपूर जिल्हा भाजपा उत्तर भारतीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष रुद्रनारायण तिवारी, बबलू रॉय, संजय रॉय, अमन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उत्तर भारतीय महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा वंदना सिन्हा, महिला सरचिटणीस गीता सिंग, महिला सरचिटणीस ममता राजभर, भद्रावती महिला शहराध्यक्षा प्रभा राजभर जनसंपर्क भाजपच्या घर चलो अभियानांतर्गत भारतीय महिला मोर्चाच्या टीमने केला.

घर चलो अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घराला भेटवस्तू दिल्या जात आहेत. पत्रक, स्टिकर, ९ सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण वर्षाच्या संदर्भात केंद्र शासन व राज्य शासनाने केलेल्या विकासकामांची माहिती देण्यात येत आहे. सरल ॲप, नमो ॲप, फ्रेंड्स ऑफ बीजेपी आणि केंद्र सरकारच्या हेल्पलाइन नंबरवर डायल करून मदतीसाठी आवाहन केले जात आहे.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी सरचिटणीस ममता राजभर, माही राय, रुमा राजभर, प्रभा राजभर, संध्या रंगारी, लक्ष्मी श्रीवास, नीतू प्रसाद, गीता देवी, इंदू कुमारी, रेणू प्रधान, रुमा राजभर, शिला प्रसाद, आशा राजभर, सबिता राजभर, किरण राजभर, लिया देवी, खुशी प्रसाद, बबिता गोंड आदी महिलांनी योगदान दिले.





  Print






News - Chandrapur




Related Photos