विकसित भारत विषयावर चित्रकला स्पर्धेत विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग


- सेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सेवा संकल्प अभियान अंतर्गत सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, नालवाडी येथे विद्यार्थिनींसाठी विकसित भारत या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत विद्यार्थिनींनी विकसित भारत या विषयावर अत्यंत उत्साहाने व कल्पकतेने सहभाग घेत आपल्या चित्रांमधून विकसित भारताचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अंकुश केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधीक्षक, सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, नालवाडी यांच्या नियोजनातून ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.
सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थिनींमध्ये सर्जनशीलतेला वाव देण्यासोबतच देशाच्या विकासाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे हा आहे.




Petrol Price




