भामरागड येथील नागरीकांनी केली नक्षल बॅनरची होळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
गडचिरोली जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याच्या पार्श्वभूमीवर संतापलेल्या नक्षल्यांकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली. सध्या नक्षली अनेक ठिकाणी बॅनरबाजी करीत आहेत. आरेवाडा मार्गावर नक्षल्यांनी लावलेले बॅनर आज १७ मे रोजी भामरागड येथील नागरीकांनी काढून त्याची होळी केली. तसेच नक्षलविरोधी घोषणा दिल्या.
आरेवाडा मार्गावर नक्षल्यांनी बॅनर बांधून विकासकामांना विरोध केला. तसेच १९ मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले. हे बॅनर तसेच नक्षल्यांची पत्रके गोळा करून नागरीकांनी  रस्त्यावर जाळून टाकले. यावेळी नक्षलवाद मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद अशा घोषणा देत नक्षल्यांचा निषेध केला.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-17


Related Photos