तहाणलेल्या गाढवी नदीपात्रात पोहचले इडीयाडोहाचे पाणी


- नदीवरील नळयोजनांना संजीवनी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
तालुक्यातून वाहणारी गाढवी नदी मागील काही दिवसांपासून कोरडी पडली होती. यामुळे नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या अनेक गावातील नळयोजना ठप्प पडून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. यामुळे पाणीटंचाईची झळ लक्षात घेता इटीयाडोहचे पाणी नदीला सोडल्यामुळे नदीत जलप्रवाह सुरू झाला आहे. आता नदीच्या पाण्याच्या भरवशावर असलेल्या नळयोजनांना नवसंजीवनी मिळाली आहे.
उन्हाळ्यास प्रारंभ होताच गाढवी नदीचे पात्र कोरडे पडले. यामुळे भिषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. ग्रामीण भागातील जनतेला पाणीटंचाईच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी नागरीकांनी अनेकदा सबंधित विभागाच्या लक्षात आणून दिले. यामुळे इटीयाडोहचे पाणी नदीला सोडण्यात आले आहे. 
आरमोरी तालुक्याची जिवनदायीनी म्हणून गाढी नदीकडे पाहिले जाते. सिंचनासोबत पिण्याच्या पाण्यासाठीही या नदीवर  योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात तसेच हिवाळ्यात या नदीला पाणी असते. मात्र उन्हाळा सुरू होताच नदी कोरडी पडते. नदीकाठावरील काही गावे या नदीच्या पाण्याच्या भरवशावरच तहाण भागवितात. जनावरांसाठीही पिण्याच्या पाण्याची सोय होते. मात्र यावर्षी ही नदी लवकरच कोरडी पडली.यामुळे पाण्याची समस्या भेडसावू लागली. नागरीकांच्या पाठपुराव्यामुळे नदीपात्रात आता पाणी खळखळू लागले आहे. यामुळे मानवासोबतच जनावरांच्याही पाण्याची सोय झाली आहे. तसेच महिलांची भटकंती करणेही दूर झाले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-04


Related Photos