महत्वाच्या बातम्या

 भाजपा शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष काशिनाथ सिंह यांच्या वाढदिवस निमित्य शहरात विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नवसिद्धी हनुमान मंदिरात पूजा अर्चना करून सुरुवात केले. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार केला गेला. वाढदिवसाच्या आधी काशिनाथ सिंह यांनी बॅनर लावू नका असे आवाहन केले होते. वाढदिवस निमित्य सफाई कामगारांचा सत्कार, गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपण करण्यात आले. वाढदिवस साजरा करत, स्वतःकाशीसिंह यांनी नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना घरी बोलवून पुष्पवृष्टी करून त्यांचा सत्कार केला. त्यांना पुष्पहार अर्पण करून व कपडे देऊन, त्यांना मिठाई खाऊ घालून, तसेच रोप देऊन सत्कार केले. यावेळी त्यांच्या पत्नी मधुमालती सिंह यांनीही त्यांना साथ दिली. कोरोनाच्या काळात किंवा उर्वरित दिवसातही ते सामाजिक कार्यात अग्रेसर राहतात.

वाढदिवसानिमित्य त्यांनी त्यांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान, महाराष्ट्र गौरव लोकनेते सुधीर मुनगंटीवार यांच्या फोटोचा हातावर टॅटूही बनवला, त्याच दिवशी त्यांनी बालाजी मंदिरात वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या शुभ हस्ते त्या टॅटूचे अनावरणही केले.

त्यांनी आवाहन केले होते की, वाढदिवसानिमित्य शहरात शुभेच्या चे बॅनर नाही लावायचे. काशीसिंह ची ही हाक, त्यांची विनंती, त्यांचा संदेश ही स्तुत्य कल्पना म्हणून घेतली जात आहे आणि काशी सिंह यांच्या विचारांचे स्वागत केले जात आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos