महत्वाच्या बातम्या

 भंडारा : रोहयो अंतर्गत चालू असलेल्या कामास जिल्हाधिकारी यांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : मोहाडी व तुमसर तालुक्यात रोहयो अंतर्गत चालू असलेल्या नाला खोलीकरण, सरळीकरण, उघडी गटारे, तलाव खोलीकरण, तलावातील गाळ काढणे या कामास, तुमसर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, सिहोरा व धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-2 येथील बॅरेज प्रकल्पाला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज भेट दिली. यावेळी तुमसर उपविभागीय अधिकारी वैष्णवी बी, तहसिलदार टेळे, तहसिलदार सुरेश वाघ उपस्थित होते.


यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रोहयो अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांनसोबत संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा व आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे यावेळी आवाहन केले. आयुष्मान भारत कार्ड असेल तर ५ लक्ष पर्यंत आपल्या कुटुंबाला वैद्यकीय उपचार मिळतो. ज्यांनी कार्ड काढलेले नाही त्यांनी ग्रामपंचायत मार्फत आयुष्मान भारत कार्ड काढावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


तसेच सर्वसामान्यांना घरे मिळावी यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, अटलबांधकाम कामगार आवास योजना, रमाई आवास योजना आहेत. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी घरकुलासाठी शासनाकडे मागणी करावी.





  Print






News - Bhandara




Related Photos