महत्वाच्या बातम्या

 महाज्योतीच्या पोलीस भरती प्रशिक्षण योजनेतील उमेदवारांचे सुयश


- १८ प्रशिक्षणार्थ्यांची पोलीस दलात निवड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, नागपूर व संबोधी अकादमी महाराष्ट्र संचालित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना महाराष्ट्रातील तसेच केंद्रातील पोलीस सेवेत संधी मिळण्यासाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येते.

महाज्योती मार्फत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आलेली आहे. प्रशिक्षणास इच्छुक नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील उमेदवारांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी एकूण ५०७ उमेदवारांनी अर्ज केले. निवड प्रक्रियेत यशस्वी ४८२ उमेदवारांनी प्रशिक्षणाचा लाभ घेता आला. उमेदवारांना दरम्यानच्या काळात प्रतिमाह ६ हजार विद्यावेतन देण्यात आले. नुकतेच या प्रशिक्षणातून १८ प्रशिक्षणार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जयश्री चव्हाण, पल्लवी चिलगर, राहूल राठोड, रोहिदास खेडेकर, विकास मुंडे, असाराम चौरे, अश्विनी राठोड, अक्षय भोई, हरसिंग जारवाल, प्रताप बोऱ्हाडे, शंकर सुल, सतीश गिरी, सुजाता सोनटक्के, जालिंदर अवघड, सुवर्णा पाटील, योगेश दारूंटे, जगदीश चव्हाण, सुरज जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे व महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या पोलीस भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos