सीमांचल एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले ; सात जणांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पाटणा :
बिहारच्या हाजीपूर येथे रविवारी भल्या पहाटे १२४८७ सीमांचल एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले आहेत. 
पूर्व-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एलसी त्रिवेदी यांनी सांगितल्याप्रमाणे, ही ट्रेन बिहारच्या जोगबनी येथून दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलच्या दिशेने जात होती. ही दुर्घटना पहाटे  हाजीपूर-बछवाडा रेलखंडच्या महनार आणि सहदोई बुजुर्ग स्टेशनदरम्यान घडली आहे. प्रवाशांनी आरोप लावला की कटिहारजवळ कपलिंगमध्ये काही बिघाड आला होता. तरीही तो दुरुस्त न करता ट्रेन आपल्या दिशेने रवाना करण्यात आली.
रुळावरून घसरलेल्या कोचमध्ये एस-७, एस-८, एस-९, एस-१०, एक जनरल कोच आणि एक एसी (बी३) डब्यांचा समावेश आहे.  डॉक्टरांच्या टीमने किरकोळ जखमींवर प्रथमोपचार केला तसेच गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पीडितांना शक्य ती सर्वच प्रकारची मदत करणार असे आश्वस्त केले. रेल्वे मंत्रालयाने मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५  लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख आणि किरकोळ जखमींना ५०हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. सोबतच, जखमी झालेल्या सर्वांचाच खर्च रेल्वे विभाग उचलणार आहे.

   Print


News - World | Posted : 2019-02-03


Related Photos