महत्वाच्या बातम्या

 मिनघरी येथे रक्तदान शिबीरात ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान


- सेवा फाऊंडेशन व आमचा गाव-आमचा विकास समिती मिनघरी द्वारा आयोजीत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती तथा महाराष्ट्र दिनानिमीत्य सेवा फाऊंडेशन व आमचा गाव-आमचा विकास  समिती मिनघरी यांच्या वतिने जि.प. उच्च प्राथमिक शाळा मिनघरी येथे रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरास युवकांनी उत्तम प्रतिसाद देत ३० रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपले सामाजीक दायित्व पार पाडले. 

उन्हाळाच्या दिवसात रुग्णाच्या वाढत्या रक्ताची मागणी व त्या प्रमाणात उन्हामुळे वेळेवर रक्तदात्यांना रक्तदानास येतांना होणारा त्रास लक्षात घेऊन तसेच शासकीय रक्तपेढीत रक्ताचा साठा नियमीत असावा या उद्देशाने रक्तदान शिबिर आयोजण केले होते. वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरीही रक्ताला पर्याय नाही. रक्तदानासारखे श्रेष्ठ दान कोणतेही नाही. निरोगी व्यक्तीद्वारे केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी केले जाते. त्यामुळेच रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान असे संबोधले जाते. रक्तदान है आपले सामाजिक कर्तव्य आहे. रक्तदान हे निःस्वार्थ भावनेने केले पाहिजे. कारण आपल्या एका रक्तदानातून कुणाला तरी जीवदान मिळणार आहे.

सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीचे डॉ. रोशन वारगसे, रूपेश घूमे, लक्ष्मीकांत गारवटे, अमोल रामटेके, संजय विश्र्वास आणि त्यांची संपूर्ण कर्मचारी यांच्या उपस्थितीत सहकार्याने पार पडले. जिल्हा चंद्रपुर रक्तपेटीच्या कर्मचारया्ंनी नवीन रक्तदात्यांना रक्तदानाचे फायदे व मार्गदर्शन केले. तसेच शिबीराचे आयोजन आणि यशस्वितेसाठी सेवा फाऊंडेशन व आमचा गाव-आमचा विकास समिती मिनघरीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos