महत्वाच्या बातम्या

 अखेर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात : आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न


- तीन राज्यातील नागरिकांना मिळणार दिलासा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील गुड्डीगुडम ते उमानुर पर्यंत डांबरीकरण होणार असून शुक्रवारी 14 एप्रिल रोजी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीआत्राम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऋतुराज हलगेकर, अतुल नागुलवार,सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार,जेष्ठ कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, गुडडीगुडम चे सरपंच सरोज पेंदाम, उपसरपंच प्रफुल नागुलवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, पराग पांढरे, माझी तंटामुक्त अध्यक्ष संदीप सिडाम, बाबुराव तोर्रेम, मांतय्या आत्राम, विजय अंबिलपवार, सचिन गणपूरवार आदी उपस्थित होते.

आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर मागील 4 ते 5 वर्षांपासून खड्ड्यांचा साम्राज्य निर्माण झाला होता. सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग असल्याने या रस्त्यावर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगाणा राज्यातील वाहनांची वर्दळ असते. मात्र, सदर रस्ता दुरुस्तीच्या कामाला निधी आणि वनविभागाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने तीन राज्यातील नागरिकांना नाहक त्रास सहन करून प्रवास करावा लागत होता. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला.

आमदार धर्मराव बाबा आत्राम  यांनी 2019 ला आमदार म्हणून निवडून आल्यावर जातीने लक्ष देऊन या कामासाठी निधी मिळावा म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतले. मात्र, वनविभागाच्या जाचक अटीमुळे या कामाला विलंब झाला होता. वन विभागाचे नाहरत प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कामाला सुरुवात होत नव्हते. संबंधित कंत्रादारांनी प्लांट टाकून वर्ष लोटून गेला.अखेर धर्मराव बाबा आत्राम यांनी पुन्हा वनमंत्र्यांना साखडे घालून नाहरकत प्रमाणपत्र मिळवून घेतले. अखेर शुक्रवारी आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी गुड्डीगुडम येथे या कामाचे भूमीपूज केले असून गुड्डी गुडम पासून तर उमानूर पर्यंत या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

 पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात होत असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर रस्त्याचा काम पूर्ण झाल्यास तीन राज्यातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.


२०० कोटींच्या निधीतून होणार रस्त्याचे काम

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६३ वर वेगवेगळ्या कंत्राटदाराकडून हे काम केले जाणार असून सिरोंचा तालुका मुख्यालयातुन समोर कामाला सुरुवात झाली आहे. गुड्डीगुडम ते उमानूर पर्यंत दुसरा कंत्राटदार हे काम करणार आहे. तब्बल २०० कोटी रुपयांच्या निधीतुन हे काम केले जाणार आहे. इतरही ठिकाणी लवकरच भूमीपूजन केले जाणार हे विशेष.





  Print






News - Gadchiroli




Related Photos