महत्वाच्या बातम्या

 पब्लिक स्कुल अहेरी येथे दुसऱ्या आंतरशालेय क्रिडा महोत्सव व वार्षीक स्नेहसंम्मेलनाला सुरुवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : डि. बी. ए. पब्लिक स्कुल अहेरी या शाळेच्या 9 दिवसीय दुसऱ्या आंतरशालेय क्रिडा महोत्सव व वार्षिक स्नेहसंम्मेलनाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात मशाल पेटवून करण्यात आली.  

कार्यक्रमाचे उद्घाटन डि.बी.ए.पब्लिक स्कुलच्या अध्यक्षा तनुश्रीताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच क्रिडा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी खो-खो, कॅरम, बुद्धीबळ, धावणे इ. स्पर्धेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

यावेळी भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, अहेरी पोलीस ठाण्याचे पीएसआय अप्पासाहेब रोकडे, राष्ट्रवादी महिला कांग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते. क्रिडा महोत्सवाला गडचिरोली जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos