महत्वाच्या बातम्या

 ग्रंथालयांनी मागणीचा प्रस्ताव २८ ऑक्टोंबरपर्यंत सादर करावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कोलकाता स्थित राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानतर्फे शासकीय ग्रंथालयांसाठी समान व असमान निधी योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात.

त्यानुषंगाने 2022-23 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहीत नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहे. त्यासंदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्जामध्ये नमुद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी व हिंदी भाषेमधील परिपूर्ण प्रस्ताव चार प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 28 ऑक्टोंबर 2022 पर्यंत पाठवावे. असे आवाहन जिल्हा ग्रंथपाल ग.मा. कुरवाडे यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos