आ. मुनगंटीवारांच्या वाढदिवसानिमित्त १०५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रमांच्या मालिकेतील दुसऱ्या दिवशी नगर परिषद नाट्य सभागृहात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी राज्याचे शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या १०५ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्मृतिचिन्ह आणि छत्री देऊन गौरव करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे तसेच इतर विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या सोहळ्याला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षण हे समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, शिस्त आणि ध्येयाप्रती समर्पित राहण्याचा संदेश दिला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा नव्या पिढीला उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देणारा उपक्रम असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजप शहराध्यक्ष ॲड. रणंजय सिंह, रेणुका दूधे, बृजभूषण पाझारे, मनीष पांडे, देवेंद्र वाटकर, नगरसेवक महेंद्र ढोके, काशीनाथ सिंह, नगरसेविका वैशाली जोशी, विद्या खरतड, शालू कुमरे, जयश्री मोहुर्ले, शुभांगी शर्मा, सारिका कनकम यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, भाजप पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी केवळ गुणवंत विद्यार्थ्यांचाच नव्हे, तर उत्कृष्ट शैक्षणिक निकाल लावणाऱ्या विविध शाळांच्या मुख्याध्यापकांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नासीर खान, मनीष पांडे आणि सतीश कनकम यांनी केले, तर देवेंद्र वाटकर यांनी आभार मानले.
News - Chandrapur




Petrol Price




