महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र कर्मचारी पतसंस्थेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, ऊर्जानगर यांच्या वतीने प्रियदर्शिनी शालेय बक्षीस योजना २०२५-२०२६ अंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कामगार मनोरंजन केंद्रात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. अनिल काथोये हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अधीक्षक अभियंता अशोक गेडाम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र बोबडे, उपाध्यक्ष विजय राठोड, मानद सचिव चेतन वानखेडे, सहसचिव कविता नवघरे यांच्यासह संचालिका रोहिणी पिदुरकर तसेच संचालक संजय उंदिरवाडे, सूरज मसराम, विलास निपाणे आणि अनिल दौडकर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके, सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची परंपरा कायम ठेवत समाजासाठी आदर्श ठरावे, असा संदेश यावेळी मान्यवरांनी दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखापाल तुलेश चालखुरे यांनी केले. प्रास्ताविक मानद सचिव चेतन वानखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन व्यवस्थापक रितेश मस्करे यांनी केले.

समारंभाला पतसंस्थेचे संचालक मंडळ, सभासद, विद्यार्थी, पालक आणि ऊर्जानगर परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या पार पडला.





  Print






News - Chandrapur




Related Photos