महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२८ जून महत्वाच्या घटना

१८३८ : इंग्लंडची राणी व्हिक्टोरि यांचा राज्याभिषेक झाला.

१८४६ : अ‍ॅडॉल्फ सॅक्स यांनी सॅक्सोफोन या वाद्याचे पेटंट घेतले.

१९२६ : गोटलिब डेमलर आणि कार्ल बेन्झ यांनी त्यांच्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून मर्सिडीज-बेंझची स्थापना केली.

१९७२ : दुसऱ्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ झाला.

१९७८ : अमेरिकेतील सर्वोच्‍व न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.

१९९४ : विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली.

१९९७ : मुष्टियुद्धात इव्हांडर होलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माइक टायसनला निलंबित करून होलिफील्डला विजेता घोषित करण्यात आले.

१९९८ : संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्‍नास वर्षे पूर्ण झाली.

१९८७ : लष्करी इतिहासात प्रथमच, इराकी युद्ध विमानांनी इराणच्या सरदश्त शहरावर बॉम्बफेक करून रासायनिक हल्ल्यासाठी नागरी लोकसंख्येला लक्ष्य करण्यात आले.

१९५० : कोरियन युद्ध - बोडो लीग हत्याकांड: ६० हजार ते २ लाख संशयित कम्युनिस्ट सहानुभूतीधारकांना फाशी देण्यात आली.

१९४८ : डिक टर्पिन यांनी विन्स हॉकिन्स यांचा पराभव करून पहिले कृष्णवर्णीय ब्रिटिश बॉक्सिंग चॅम्पियन बनले.

१९४२ : दुसरे महायुद्ध - ऑपशन केस ब्लू: नाझी जर्मनीने सोव्हिएत युनियन विरुद्ध आक्रमण सुरू केले.

१९१९ : व्हर्सायचा तह - जर्मनी आणि मित्र राष्ट्रांमधील या तहामुळे पहिले महायुद्ध संपले.

१९१७ : पहिले महायुद्ध - ग्रीस देश मित्र राष्ट्रांमध्ये सामील झाला.

१९१४ : ऑस्ट्रियाचा आर्कड्यूक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी, डचेस ऑफ होहेनबर्ग यांची हत्या. पहिल्या महायुद्धाची सुरवात होण्यासाठी ही घटना कारणीभूत आहे.

१९११ : नखला उल्कापात - पृथ्वीवर इजिप्त देशामध्ये पडली.

१९०४ : एसएस नॉर्गे जहाज - उत्तर अटलांटिक महासागरात हे जहाज बुडाले, यात किमान ६३५ लोकांचे निधन.

२८ जून जन्म

१४९१ : इंग्लंडचा राजा हेन्‍री (आठवा) यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १५४७)

१७१२ : फ्रेंच विचारवंत, लेखक संगीतकार रुसो यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १७७८)

१९२१ : भारताचे ९वे पंतप्रधान, वाणिज्य उद्योगमंत्री नरसिम्हा राव यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००४)

१९२८ : चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक बाबूराव सडवेलकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०००)

१९३४ : कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज रॉय गिलख्रिस्ट यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै २००१)

१९३७ : साहित्यिक समीक्षक, दलित साहित्य दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक डॉ.गंगाधर पानतावणे यांचा जन्म.

१९७० : पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक मुश्ताकअहमद यांचा जन्म.

१९५९ : भारतीय कादंबरीकार टी. पी. राजीवन यांचा जन्म (मृत्यू : २ नोव्हेंबर २०२२)

१९३८ : श्रीलंकन तमिळ वृत्तपत्र प्रकाशक आणि राजकारणी एस. शिवमहाराज यांचा जन्म (मृत्यू : २० ऑगस्ट २००६)

१९२६ : सीटी स्कॅनचे शोधक रॉबर्ट लिडले यांचा जन्म (मृत्यू : २४ जुलै २०१२)

१९०६ : जर्मन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक विजेते मारिया गोएपर्ट-मेयर यांचा जन्म (मृत्यू : २० फेब्रुवारी १९७२)

१२४३ : जपान देशाचे सम्राट गो-फुकाकूसा यांचा जन्म (मृत्यू : १७ ऑगस्ट १३०४)

२८ जून मृत्यू

१८३६ : अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १७५१)

१९७२ : प्रसिध्द भारतीय संख्याशास्रज्ञ तसेच इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे निधन. (जन्म: २९ जून १८९३)

१९८७ : व्हायोलियनवादक, गायक, संगीतज्ञ पं. गजाननबुवा जोशी यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९११)

१९९० : कवी प्रा. भालचंद खांडेकर यांचे निधन.

१९९९ : स्वातंत्र्य सैनिकांचे नेते झुंजार पत्रकार रामभाऊ निसळ यांचे निधन.

२००० : उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९२७)

२००६ : संत साहित्यकार, समीक्षक, वक्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन.

२००९ : भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक ए. के. लोहितदास यांचे निधन. (जन्म: ६ मे १९५५)

२०२२ : भारतीय राजकारणी, केरळचे आमदार टी. शिवदासा मेनन यांचे निधन (जन्म: १४ जून १९३२)

२०२२ : भारतीय वंशाचे आयरिश उद्योगपती, शापूरजी पालोनजी समूहाचे अध्यक्ष - पद्म भूषण पालोनजी मिस्त्री यांचे निधन (जन्म: १ जून १९२९)

२०२२ : भारतीय फील्ड हॉकी खेळाडू - ऑलिम्पिक कांस्यपदक, ध्यानचंद खेलरत्न वरिंदर सिंग यांचे निधन (जन्म: १६ मे १९४७)

२०२० : भारतीय कन्नड स्त्रीवादी लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गीता नागाभूषण यांचे निधन (जन्म: २ मार्च १९४२)

२००७ : अमेरिकन अॅडमिरल - मेडल ऑफ ऑनर विजेते यूजीन बी. फ्लकी यांचे निधन (जन्म: ५ ऑक्टोबर १९१३)

१९१४ : ऑस्ट्रिया-हंगेरीच्या साम्राज्याचे वारस आर्कड्यूक फ्रांझ फर्डिनांड यांचे निधन (जन्म: १८ डिसेंबर १८६३)

१९१४ : ऑस्ट्रिया-हंगेरीच्या साम्राज्याचे वारस सोफी, डचेस ऑफ होहेनबर्ग यांचे निधन (जन्म: १ मार्च १८६८)





  Print






News - todayspecialdays




Related Photos