आजचे दिनविशेष


२९ मे महत्वाच्या घटना
१७२७ : पीटर (दुसरा) रशियाचा झार बनला.
१८४८ : विस्कॉन्सिन अमेरिकेचे ३० वे राज्य झाले.
१९१४ : ओशियन लाइनर आर.एम.एस. इंप्रेस ऑफ आयर्लंड जहाज बुडून त्यात १९९२ लोक ठार झाले.
१९१९ : अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी घेण्यात आली.
१९५३ : एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग यांनी दुपारी ११:३० वाजता माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर केले.
२०२२ : ऑल दॅट ब्रीदस् - या भारतीय माहितीपटाने ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गोल्डन आय (LOeil dor) पुरस्कार जिंकला.
२०२२ : सिद्धू मूसवाला - पंजाबी गायक यांची गोळ्या घालून हत्या.
२०२२ : तारा एअर फ्लाइट १९७ दुर्घटना - हे विमान नेपाळ मध्ये कोसळले. यात असलेले १९ प्रवासी आणि ३ कर्मचारी यांचे निधन.
२९ मे जन्म
१९०६ : भारतीय-इंग्लिश लेखक टी. एच. व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९६४)
१९१४ : एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९८६)
१९१७ : अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)
१९२९ : ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचा जन्म.
१९४० : पाकिस्तानचे ८वे राष्ट्रपती फारूख लेघारी यांचा जन्म (मृत्यू : २० ऑक्टोबर २०१०)
१९४० : ४८वे योकोझुना, जपानी सुमो ताइहो कोकी यांचा जन्म (मृत्यु: १९ जानेवारी २०१३)
१९२० : हंगेरियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार विजेते जॉन हर्सनी यांचा जन्म (मृत्यू : ९ ऑगस्ट २०००)
१९०५ : किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचा जन्म (मृत्यू : २० नोव्हेंबर १९८९)
२९ मे मृत्यू
१८१४ : नेपोलियन बोनापार्ट यांची पहिली पत्नी जोसेफिन डी बीअर्नार्नास यांचे निधन. (जन्म: २३ जून १७६३)
१८२९ : विद्युत पृथक्करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हंफ्रे डेव्ही यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १७७८)
१८९२ : बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८१७ – तेहरान, इराण)
१९७२ : अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९०१)
१९७७ : भाषाशास्त्रज्ञ सुनीतिकुमार चटर्जी यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १८९०)
१९८७ : भारताचे ५ वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे निधन. (जन्म: २३ डिसेंबर १९०२)
२००७ : संगीतकार स्नेहल भाटकर यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९१९)
२०१० : समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक ग. प्र. प्रधान यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १९२२)
२०२२ : पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांचे निधन (जन्म: ११ जून १९९३)
१९९५ : यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि युनायटेड स्टेट्स सिनेट या दोन्ही ठिकाणी सेवा देणाऱ्या पहिल्या महिला मार्गारेट चेस स्मिथ यांचे निधन (जन्म: १४ डिसेंबर १८९७)
१९७९ : अमेरिकन चित्रपटसृष्टीतील अग्रणी कलाकार मेरी पिकफोर्ड यांचे निधन (जन्म: ८ एप्रिल १८९२)
News - todayspecialdays




Petrol Price




