महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात १ मे रोजी महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे, सैनिकी निदेशक ऋषी वंजारी आणि हरिप्रसाद ध्यानी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यानंतर महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बौद्ध पौर्णिमेचे महत्त्व पर्यवेक्षक अजय वानखेडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले.

प्राचार्य संग्रामे यांनीही विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना या विशेष दिवसांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगितले. संगीत शिक्षक सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात महाराष्ट्र गीत गायन करून वातावरण देशभक्तीमय केले.

कार्यक्रमाचे सुंदर संचालन ज्येष्ठ शिक्षक भूपेंद्र चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष कुळमेथे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos