महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : खरीप हंगाम सन २०२६-२०२७ साठी जिल्ह्यातील पिकनिहाय ४ लाख १९ हजार ३३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून सोबतच बियाणे मागणी व रासायनिक खतांचे नियोजन सुध्दा कृषी विभागामार्फत निश्चित करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागामार्फत खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

कापूस २ लाख २४ हजार ९९६ हेक्टर, सोयाबिन १ लाख २४ हजार ५०० हेक्टर, तूर ६५ हजार ६१० हेक्टर व मका २ हजार ५०० हेक्टर,  व इतर पिकांसाठी ५ हजार  ७२९ हेक्टर क्षेत्रावर पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. मागील २ वर्षापासुन चारकोट रॅाटमुळे सोयाबीन पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी यावर्षी सोयाबीन पिकाची पेरणी कमी करुन १ लाख २४ हजार ५०० हेक्टरवर आनण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सोयाबीनचे हे कमी केलेले क्षेत्र मका, कापूस आणि तूर या पिकांकडे वळविण्यात आले आहे. मका पिकांचे क्षेत्र ७६ हेक्टरवरुन यावर्षी २ हजार ५०० हेक्टर पर्यंत वाढविण्यात आले आहे.कापूस मागील पिकाचे मागील वर्षाच्या २ लाख १६ हजार ८२३ हेक्टर वरुन यावर्षी २ लाख २४ हजार ९९६ हेक्टर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. तर तुरीचे ५९ हजार ४९८ वरुन ६५ हजार ६१० हेक्टर नियेाजन करण्यात आलेले आहे.

खरीप हंगामासाठी १ लाख १७ हजार १०० मेट्रीक टन रासायनिक खतांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये युरिया ३४ हजार ५०० मेट्रीक टन, डीएपी  १४ हजार ३०० मेट्रीक टन, व संयुक्त खते ३५ हजा ५०० मेट्रीक टनाचे नियोजन करण्यात आले असून आज अखेर जिल्ह्यात ५५ हजार २२२ मेट्रीक टन खताचा साठा शिल्लक आहे.  

शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे व शिफारशीनुसार खतांचा वापर करावा. कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पेरणी करावी. पावसाच्या आगमनानुसार वेळेवर पेरणी करावी. अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहाय्यक/कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos