महत्वाच्या बातम्या

 मोगरा फुलला सांस्कृतिक कार्यक्रमाचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ज्ञानेश्वर माऊलीच्या ७५० व्या जयंती निमित्त आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम ज्ञानियाचा राजा यावर आधारीत व्याख्याते गणेश शिंदे यांच्या मोगरा फुलला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्धा राजुरवार, स्वास्थ व समाज विषयक प्रबोधनकार गणेश शिंदे, सन्मीताताई शिंदे, डॉ. सचिन पावडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयेाजित मोगरा फुलला कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले. ज्ञानेश्वर माऊलीचे चरित्र, अभंग व काव्य जगभर पोहोचावे यासाठी राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात मोगरा फुलला कार्यक्रमाचे राबविण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे राज्यातील प्रत्येक कुटूंबात ज्ञानेश्वर माऊलीची गाथा पोहोचण्यास मदत होईल, अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्यात.

यावेळी गणेश शिंदे यांनी ज्ञानेश्वर माऊली गाथा आपल्या समधूर वाणीतून तसेच सन्मीता शिंदे यांनी त्यांना अभंग गायनासाठी सुरेख साथ दिली. कार्यक्रमाचे संचालन पल्लवी पुरोहित यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात श्रोते उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos