महत्वाच्या बातम्या

 गोंदियात बँकेतील ग्राहकांचे पैसे लंपास : व्यवस्थापक व मॅनेजर विरोधात फसवणुकीचा गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदियात बँकेतील ग्राहकांचे पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याची घोडदौड उघडकीस आली आहे. ही घटना आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत शहरातील उपशाखेत १८ जुलै २०२४ ते १६ जानेवारी २०२५ दरम्यान घडली.

फिर्यादी मुकेश प्रणानंद रहांगडाले (३०, रहिवासी माली) यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी सुशील प्रदीप उके (२१, रहिवासी केवलयाडा, वाघोली) जो भारत फायनान्शियल इन्फ्युजन लिमिटेड कंपनीच्या इन्डुशिन्ड बँकेच्या उपशाखेत मॅनेजर पदावर कार्यरत होता, त्याने बँकेच्या १४ सदस्यांची एकूण ₹१ लाख ९४ हजार ९४३ रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. यामुळे कंपनी व कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना फसवणूक झाली आहे.

पोलिसांनी बुधवारी (१) भान्यासं २०२३ कलम ३०६(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.





  Print






News - Gondia




Related Photos