महत्वाच्या बातम्या

 गोंदियात दुचाकीस्वारावर चांदणी चौकात मारहाण : आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : शहरातील चांदणी चौक परिसरात गुरुवारी १९ रात्री सुमारे ९:१० वाजता दुचाकीवर जात असलेल्या तरुणावर दोन व्यक्तींनी रस्त्यात अडवून मारहाण केली.

सावराटोली, सुभाष वॉर्ड येथील रहिवासी रिषभ दुलचंद बैरीसाल (२४) हा आपल्या कामावरून घरी जात असताना ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रथमजीत राणे (२३) आणि चंगेश नैताम (२५), दोघेही दसखोली रहिवासी, यांनी रिषभची दुचाकी चांदणी चौक येथे थांबवली. त्यांनी त्याला जबरदस्तीने आमच्यासोबत गोल्ड सिनेमा येथे चला असे सांगितले.

रिषभने त्यांचा आग्रह नाकारला, तर आरोपींनी त्याची दुचाकीची चावी काढून घेतली व अश्लील शब्दांचा वापर करत धक्काबुक्की केली. त्यानंतर हाताबुक्क्यांनी त्याच्या गालावर मारहाण करून त्याला जखमी केले.

घटनेनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई केली. शुक्रवारी २० भारतीय दंड संहिता कलम १२६(२), २९६, ११५(२), ३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

शहरातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेकडे लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.





  Print






News - Gondia




Related Photos