महत्वाच्या बातम्या

 डॉ. देवराव होळी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार : गडचिरोलीच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ही भेट मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान पार पडली.

या भेटीत डॉ. होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रलंबित समस्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, दुर्गम भागातील रस्त्यांची अवस्था, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था तसेच आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. होळी यांनी मांडलेल्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन दिले. जिल्ह्याच्या विकासासाठी शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी सूरज मडावी, श्याम सलामे आणि सचिन भोयर हेही उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.





  Print






News - Rajy




Related Photos