जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली अपघातग्रस्ताची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी :
  आलापल्ली येथील रहिवासी अशोक गंगाराम इस्टम आणि सुशील आत्राम हे दोघे पेरमिली वरून आलापल्ली कडे येत असताना  तलवाडा गावाजवळ त्यांच्या दुचाकी वाहनाला शॉर्ट बोलेरो वाहनाने धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. या बाबीची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी रुग्णालय गाठून जखमींची विचारपूस केली. 
अशोक गंगाराम इस्टम आणि सुशील आत्राम  यांच्यावर  अहेरी येथे  उपचार सुरु आहे.   जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय  कंकडालवार  यांच्या भेटीप्रसंगी यावेळी पेरमिलीचे सरपंच प्रमोद आत्राम  ,  पेरमिली चे उपसरपंच  साजन गावडे, विनोद आत्राम, महेश सडमेक, संदीप मडावी, सुधीर आत्राम,  जावेद पठाण,  मनोज सडमेक,  गजानन सडमेक उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-19


Related Photos