महत्वाच्या बातम्या

 मुंबईसह राज्यात उष्णतेची लाट : तापमान ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाल्याने मुंबईसह राज्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. हवामान विभागाने नागरिकांना उष्ण हवामानासाठी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

महामुंबईमध्ये ही उष्णतेची लाट ११ मार्चपर्यंत राहणार असून, १२ आणि १३ तारखेला तापमान थोडेसे खाली येण्याची शक्यता आहे. उष्णतेचा विपरीत परिणाम म्हणून रायगड, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि मुरबाड परिसरात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

ठाणे आणि नवी मुंबईमध्ये तापमान ३९ ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर मुंबई शहरात कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

हवामान तज्ज्ञ अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले की, १३ मार्चनंतर उत्तर-पश्चिम दिशेकडून वारे वाहू लागल्यावर कमाल तापमानात किंचित घट होईल. मात्र, त्याआधी मुंबईकरांना पुन्हा उष्ण हवामानाचा सामना करावा लागणार आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही उष्ण हवामान कायम राहणार असून, येथे कमाल तापमान ३६ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. पुण्यात कमाल तापमान सुमारे ३६ अंश सेल्सिअस असेल.

हवामान तज्ज्ञ नागरिकांना उन्हात जास्त वेळ घालवणे टाळण्याचा, पुरेसे पाणी पिण्याचा आणि उष्ण हवामानाशी निगडीत इतर काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos