भरधाव कारची दुचाकीला धडक : दाम्पत्य गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / अमरावती : स्थानिक परतवाडा रोडवरील साई मंदिराजवळ भरधाव कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध १४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात चांदूरबाजार येथील निवृत्त शिक्षक जमील शेख रसूल आणि त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी जमील शेख हे पत्नीसमवेत दुचाकीवरून एका स्वागत समारंभासाठी जात होते. ते साई मंदिराजवळून मार्गक्रमण करत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या एमएच ४० एआर ६०१३ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत दोघेही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या घटनेची नोंद घेऊन संबंधित कारचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
News - World




Petrol Price




