महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज तालुक्यातील गांधीनगर गावाला मिळणार पहिली महिला सरपंच


- सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : तालुक्यातील सावंगी ग्रामपंचायतचे विभाजन होऊन ५ नोव्हेंबर २०१९ ला अस्तित्वात आलेल्या पुनर्वसित गांधीनगरच्या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक येत्या १६ ऑक्टोबरला पार पाडल्या जाणार आहे. दरम्यान थेट जनतेतून निवडुन देण्यासाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत येथील पहिल्या सरपंच बनण्याचा मान अनुसूचित जातीच्या महिलेला मिळणार असुन पदाची माळ मात्र कुणाच्या गळ्यात पडणार याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागुन आहे. देसाईगंज पंचायत समितीच्या २० ग्रामपंचायतीं अंतर्गत एकुण ३९ गावे येत असुन तत्कालीन स्थितीत गांधिनगर व सावंगी गट ग्रामपंचायत अस्तित्वात होती. दरम्यान गांधिनगर ते सावंगी या दोन गावातील अंतर जास्त असल्याने गांधिनगर स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी जोर धरू लागली होती. अखेर ५ नोव्हेंबर २०१९ रोजी गांधिनगर या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला असला तरी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात न आल्याने येथील कारभार प्रशासकाच्या माध्यमातून चालविण्यात येत आहे.गांधिनगर ग्रामपंचायती अंतर्गत एकुण १ हजार २९० मतदार असुन यात ६३३ महिला तर ६५७ पुरुष मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावतील. सरपंच पदासाठी एकुण ३ नामांकन दाखल करण्यात आले आहेत तर एकुण ९ सदस्यासाठी २३ नामांकन दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान १६ ऑक्टोबर रोजी सार्वत्रिक निवडणुक पार पाडुन १७ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रथम महिला सरपंचाचा तसेच भावी सदस्यांचा निकाल स्पष्ट होणार आहे.दरम्यान सावंगी ग्रामपंचायतची निवडणुक देखील १६ ऑक्टोबर ला पार पाडण्यात येणार आहे. येथील सरपंच पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असुन एकुण ९ सदस्यीय असलेल्या निवडणुकीचा निकाल १७ ऑक्टोबर २०२२ रोजी लावण्यात येणार असल्याने यात कोण बाजी मारते याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागुन आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos