केळझर येथे न थांबणाऱ्या बसेस विरोधात प्रहारचा आक्रमक पवित्रा


- बस चालक आणि वाहकांचा मनमानी कारभार...! प्रहारचा आंदोलनाचा इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / सेलू : 
  वर्धा ते नागपूर मार्गावरील केळझर येथे एस टी महामंडळाच्या सर्वच लाल बसांना थांबा असूनही बस चालक व वाहक आपल्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना व विद्यार्थ्यांना वेठीस धरतात. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी घडल्यानंतर प्रहारने आक्रमक पवित्रा घेत अखेर नागपूर - यवतमाळ ही बस रस्त्यावर आडवे होत थांबविल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
 याबाबत सविस्तर वृत्त असे की, केळझर येथील रहिवासी सलीम सैय्यद हे नागपूरवरुन केळझर येथे जाण्यासाठी नागपुर - यवतमाळ  एमएच ४० एन ९६०९ या क्रमांकाच्या बसमध्ये प्रवासाकरिता चढले. दरम्यान बसमधील वाहकाने त्यांना केळझर येथे बसला थांबा नसल्याचे सांगत तिकीट देण्यास नकार दिला व सेलू येथील तिकीट घ्यायला भाग पाडले.सेलूची तिकीट काढल्यावर सुद्धा बस वाहक हा बस केळझर येथे  थांबविण्यास टाळाटाळ करत असल्याचे सलीम यांच्या निदर्शनास आले. सलीम सैय्यद यांनी ही माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे केळझर येथील कार्यकर्ता सतिश भलावी यांना फोनवरून दिली. सदर माहिती प्राप्त होताच प्रवाशाची अडचण लक्षात घेऊन प्रहारचे संजय मेश्राम, मिलिंद गव्हाळे, गणेश धर्मुळ, सतीश भलावी,आकाश चुटे आणि सुरज गव्हाळे हे बस स्थानकावर उपस्थित झाले. प्रहारने गावकर्‍यांच्या मदतीने बस केळझर येथे थांबवुन प्रवाशास उतरण्यास मदत केली. 
 केळझर येथे एसटी महामंडळाच्या सर्व लाल बसेसला थांबा देण्यात आला असून सुद्धा चालक आणि वाहक केळझर येथे बस थांबविण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सकाळच्या वेळेस प्रवासी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असुन सुध्दा बस थांबत नाही. मुख्यमंत्री यांनी दत्तक घेतलेल्या केळझर येथील विद्यार्थ्यांच्या या दयनीय अवस्थेकडे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी प्रहारकडुन केली जात आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 

   Print


News - Wardha | Posted : 2018-09-29


Related Photos