किष्टापूर येथील गुराख्याचा उष्माघाताने मृत्यू !


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / येनापूर :
चामोर्शी तालुक्यातील किष्टापूर येथील गुराख्याचा गुरे चारण्यासाठी जंगलात गेल्यानंतर उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
नानाजी लक्काजी आलाम (५५) असे मृतक गुराख्याचे नाव आहे. नानाजी आलाम हा सकाळी गुरे चारण्यासाठी जंगलात गेला होता. दुपारी १२.३०  वाजताच्या दरम्यान त्याने आपल्याजवळील बाटलीतील पाणी प्राशन केले. यानंतर त्याची प्रकृती खालावली. लगेच त्याचा मृत्यू झाला. याबाबत विनायक भिवाजी आलाम यांनी आष्टी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आष्टी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. 
सध्या पावसाळा अंतीम टप्प्यात असल्याने उन्हाची तिव्रता प्रचंड वाढली आहे. सकाळपासूनच उकाडा वाढत असल्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याची गरज आहे.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-29


Related Photos