शासकीय हमीभावने धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूर येथे धान खरेदी करण्यात येणार आहे. धान/भात साधारण एफ.ए.क्यू प्रति क्विंटल २४४१ रुपये असून शासनाने दिलेल्या निकषानुसार एफ.ए.क्यू दर्जाचा शेतमाल खरेदी करण्यात येणार आहे.
धान खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली शासनाच्या बीम पोर्टलवर आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करून बायोमेट्रिक पध्दतीने ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना नोंदणीसाठी स्वत:हजर राहणे आवश्यक आहे.
चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समिती खरेदी केंद्रावर आधार लिंक मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, बॅक पासबुक, खरीप हंगाम २०२६-२७ धान पीक पेरासह ७/१२ उतारा, ७/१२ उतारा सामाईक असल्यास हिस्सेदाराचे आधार कार्डवर सह्या व त्यांचे संमतीपत्र या आवश्यक कागदपत्रासह नोंदणी करून घ्यावी व शासकीय हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समिती कडून करण्यात येत आहे.




Petrol Price




