कुरुड येथील २० वर्षिय तरुणी दोन महिन्यापासून बेपत्ता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
तालुक्यातील कुरूड येथील २० वर्षिय तरुणी मागील दोन महिन्यापासून बेपत्ता असुन सदर बेपत्ता तरूणी कुणाला आढळून आल्यास अथवा तिच्या बाबतीत काही माहिती मिळाल्यास संबंधितांनी देसाईगंज पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन देसाईगंज पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातुन केले आहे. 
निशीगंधा शञुघ्न झुरे (२०) वर्षे रा.कुरूड असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव असुन ती ३ नोव्हेंबर २०१९ रोजी आपल्या राहत्या घरून कुणाला काहीही न सांगता घरून निघुन गेली आहे. सदर तरुणीबाबत नातेवाईक,आप्तीष्ठांकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही. 
सदर तरुणी ५. २ फुट उंचीची असुन सडपातळ बांधा, गोरा रंग, काळे लांब केस, आकाशी रंगाचा टाॅप व निळ्या रंगाची लॅगीन, लंबगोल चेहरा व मराठी, हिंदी इंग्रजी भाषा अवगत असलेल्या वर्णणाची आहे. उपरोक्त वर्णणाची तरुणी कोणाला आढळून आल्यास अथवा तिच्या बाबतीत काही माहिती मिळाल्यास संबंधितांनी देसाईगंज पोलिसांशी ०७१३७-२७२०२७ अथवा ९४२१७८४७७० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देसाईगंज पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातुन केली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-12


Related Photos