महत्वाच्या बातम्या

 ई- पीक पाहणी ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : शेतकऱ्यांनी स्वतः आपला पीक पेरा नोंदविल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली ई- पीक पाहणी स्वयं प्रमाणित मानण्यात येणार आहे. पिकाची नोंद घेत असताना चुकीची नोंद असल्यास स्वतः शेतकऱ्यांना ४८ तासात दुरुस्ती करता येईल.

उन्हाळी हंगाम २०२३-२४ पीक पाहणी कार्यवाही १५ एप्रिल २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे. तसेच ई-पीक पाहणी हे मोबाईल ॲप गुगल प्लेस्टोअरवर १५ एप्रिल २०२४ पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपण यापूर्वी सदर ॲप मोबाईलवर Install केले असल्यास त्याला Update करावे किंवा Uninstall करून परत गुगल प्लेस्टोअरवर सर्च करून Install करावे. ई-पीक पाहणी हे मोबाईल ॲप आपल्या मोबाईल मध्ये नसल्यास गुगल प्लेस्टोअरवर सर्च करून Install करावे व उन्हाळी हंगामातील पीक पाहणी येत्या ३० एप्रिल, २०२४ पर्यंत विहित वेळेत पूर्ण करावे, तसेच पिक पाहणी करतांना अडचणी आल्यास (०२०२५७११७१२) या टोल फ्री क्रमांका वर कॉल करावे. असे उपजिल्हाधिकारी महसूल  शारदा जाधव यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos