महत्वाच्या बातम्या

 बनावट मार्कशीट बनवणाऱ्यांविरुद्ध होणार कडक कारवाई : मुंबई पोलिसांकडून तपास सुरु


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका १० ते १२ हजारात घरबसल्या मिळेल, अशा जाहिराती गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. विशेष म्हणजे ही जाहिरात पाहून पुण्यातील एका व्यक्तीने काही रक्कम देत बनावट गुणपत्रिका बनवून घेतली होती.

हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाकडून यांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या घटनेनंतर आता मुंबई विद्यापीठाकडून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

नेमके प्रकरण काय?

पुण्यातील एका व्यक्तीने फेसबुकवर मुंबई विद्यापीठाची पदवी घरी बसून एका दिवसात बनवून मिळेल अशी जाहिरात पाहिली होती. यासाठी १० ते १२ हजार रुपये लागतील, असे यात नमूद करण्यात आले आहे. ही जाहिरात पाहून त्याने जाहिरातीतील फोनवर एका व्यक्तीशी संपर्क केला होता. त्याने २ हजार रुपये ॲडव्हान्स मागितले. ही रक्कम भरल्यानंतर त्याला त्याच्या व्हॉटसॲपवर मुंबई विद्यापीठाची बीएससीची एक कथित बनावट गुणपत्रिका प्राप्त झाली. या धक्कादायक प्रकार मुंबई विद्यापीठाला समजल्यानंतर मुंबई विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी गंभीर दखल घेतली.

त्यानंतर त्यांनी याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. आता याप्रकरणी मुंबई विद्यापीठाने घेऊन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुंबई विद्यापीठाने केलेल्या या पोलीस तक्रारीत सदर प्रकारची बाब समाजाची दिशाभूल आणि आर्थिक फसवणूक करणारी आहे. तसेच यामुळे मुंबई विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे. तरी या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जेणेकरुन या सर्व प्रकाराला आळा बसण्यास मदत होईल, अशा आशयाची लेखी तक्रार करण्यात आली आहे.

बनावट मार्कशीट देणाऱ्यापासून सावध रहा -

तसेच विद्यार्थ्यांनी अशाप्रकारच्या कोणत्याही फसव्या जाहिरातीला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये. ही पदवी किंवा गुणपत्रिका बनावट आहे. फोटोशॉप किंवा इतर साधनाचा वापर करून बनावट गुणपत्रिका किंवा पदवी बनविली आहे. या सोबत ज्या व्यक्तींनी गुणपत्रिका घेतली आहे. तीच बनावट आहे. एप्रिल २०२३ ची बीएससी सत्र ६ ची कथित गुणपत्रिका असून त्यावर स्वाक्षरी मात्र यापूर्वीच्या जुन्या परीक्षा संचालकांची आहे. यामुळेच अशा बनावट गुणपत्रिका व पदवी देणाऱ्यापासून सावध रहावे, असे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos