महत्वाच्या बातम्या

 परवानाधारकांना आचारसंहितेत शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध : जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक आचारसंहिता कालावधीत नागपूर जिल्हा व ग्रामीण भागातील शस्त्र परवाना धारकांना शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. सदर आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले. ६ जून २०२४ पर्यंत हे प्रतिबंध लागू राहतील. याचबरोबर शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम २१ मधील तरतूदीनुसार शस्त्र परवान्यावर नोंदविलेले शस्त्रे जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्याबाबत संबंधितांना कळविण्यात आले आहे. हा मनाई आदेश जो समाज दीर्घकालिन स्थायी कायदा, रुढी व परीपात यानुसार शस्त्रास्त्र बाळगण्यास हक्कदार आहे त्या समाजाला लागू असणार नाही. तथापि अशा समाजातील व्यक्ती हिंसाचारात सहभागी असल्याचे आढळून आल्यास, कायदा व सुव्यवस्था राखण्यास अडचण निर्माण करीत असल्याचे आढळून आल्यास, निवडणूक शांततेच्या मार्गाने पार पाडण्यास अडथळा निर्माण करीत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तीची शस्त्रास्त्र अडकावून ठेवण्यास जिल्हा प्रशासनास कोणताही प्रतिबंध असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.  

सदर आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी-कर्मचारी, बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. या व्यक्तींकडून त्यांच्याकडील शस्त्राच्या, हत्याराचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनाच्या अधिकाऱ्यांवर राहील.





  Print






News - Nagpur




Related Photos